🕒 1 min read
नवी दिल्ली: दिनांक ३ फेब्रुवारी (बुधवार) भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ९६ धावाने खुर्दा पाडला. भारताकडून कर्णधार यश धुलने ११० तर शेख रशीदने ९४ धावा केल्या. या दोघांनी तर अत्यंत स्फोटक फलंदाजी तर केलीच परंतु भारताचा विकेटकीपर फलंदाज दिनेश बानाने देखील स्फोटक फलंदाजी केली. त्याने खेळलेले सर्व चेंडू त्याने सीमारेषेबाहेर धाडले. १९ वर्षाखालील वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी पराभव केला आणि सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. कालच्या सामन्यात भारताकडून कर्णधार यश धुलने ११० तर शेख रशीदने ९४ धावा केल्या. या दोघांनी केलेल्या अर्धशतकी भागिदारीच्या जोरावर भारताने ५ बाद २९० धावा केल्या.
भारताच्या फलंदाजीची सुरुवात जरासी अडखळत झाली होती. मात्र यश धुल आणि शेख रशी या दोघांनी भारताचा डाव आपापल्या परीने सावरला. या दोघांनी केलेल्या अफाट फलंदाजीमुळे भारताने ५ बाद २९० धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा पाठलाग करताना ४१.५ षटकात फक्त १९४ धावांवर बाद झाला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांना गोलंदाजांनी देखील अप्रतिम साथ दिली. फिरकीपटू विक्की ओस्तवालने ४२ धावात ३ तर निशांत सिंधू आणि कवी कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेत्या. कौशल तांबे आणि अंगक्रिश रघुवंशीने प्रत्येकी एक विकेट पटकावली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताकडून कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी शानदार कामगिरी केली.
या शिवाय अखेरच्या षटकात विकेटकीपर फलंदाज दिनेश बाना याने सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे भारताला २९० पर्यंत मजल मारता आली. बानाने निशांत सिंधूसह अखेरच्या षटकात २७ धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाकडून व्हिटनीने अखेरची ओव्हर टाकली. पहिल्या दोन चेंडूवर सिंधूने चौकार आणि षटकार मारला, तर तिसऱ्या चेंडूवर लेग बायच्या रुपात एक रन घेतली.
महत्वाच्या बातम्या :
- ऑलिंपिक पदक विजेता गोलकिपर श्रीजेशने जाहीर केली विश्वचषक जिंकण्याची इच्छा म्हणाला…
- मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि त्यांचा वेताळ बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो- सचिन सावंत
- घरकुल योजनेवरुन औरंगाबादेत भाजप आक्रमक; महाविकास आघाडीवर केला योजना अयशस्वी केल्याचा आरोप!
- अभिनयातील देव हरपला…
- मुंबई महानगरपालिकेचा या वर्षीचा शैक्षणिक अर्थसंकल्प जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
