Share

“गृहमंत्र्यांच्या घरात मणिपूरच्या नेत्यांना बुट काढायला लावले…”; राहुल गांधींचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: एका मणिपूरच्या नेत्यांना अमित शाह यांच्या निवासस्थानी बुट काढण्यास सांगितले होते, अमित शहा स्वतः मात्र चप्पल घालून होते, असा आरोप राहुल गांधीनी गृहमंत्री अमित शहांवर केला आहे. ते संसदेत बोलत होते. “काही दिवसांपूर्वी एक राजकीय नेता मणिपूरहून माझ्याकडे आला. त्याला खूप राग आला. का रागावला आहेस, असे मी त्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, ‘राहुल जी, काही दिवसांपूर्वी मी जेवढे अपमानित झालो आहे, तसे मला यापूर्वी कधीच वाटले नव्हते, मला अमित शहांच्या घरी चप्पल काढून जावे लागले, पण ते स्वतः मात्र चप्पल घालून होते'”, असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

पण हा नेता कोण होता हे सांगणे त्यांनी टाळले. तत्सम नेता मणिपूरमधील वरिष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ घेऊन गृहमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्यानंतर शिष्टमंडळातील सदस्यांना शहांच्या घराबाहेर बुट काढायला सांगितले आणि जेव्हा ते गृहमंत्र्यांच्या खोलीत गेले, तेव्हा त्यांना शाह स्वतः चप्पल घालून बसल्याचे दिसले, असा आरोप त्या नेत्याचा असल्याचे राहुल गांधीनी सांगितले. मणिपूरच्या नेत्याने तसा फोटो ही दाखवला, असे राहुल गांधी म्हणाले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयलांनी राहुल गांधीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी गृहमंत्र्यांवर अत्यंत हास्यास्पद आरोप केला जात आहे, असे ते म्हणाले. तुम्ही आमच्या सर्व लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. चप्पल काढून घरात प्रवेश करणे आपल्या धार्मिक परंपरेचा भाग आहे. आपल्या धार्मिक परंपरांबद्दल ते या सभागृहात अशी टीका करू शकतात का? ते धार्मिक परंपरांवर आघात करत आहे. हा आपल्या सर्वांच्या धार्मिक परंपरांवरचा हल्ला आहे, असे गोयल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!