Share

‘सुपारीबाज’ आमदार; नितेश राणेंवर आणखी एक आरोप

Published On: 

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश यांना कणकवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

संतोष परब हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच ते जिल्हा बँकेमध्ये दोन मतांचा अधिकार असलेले मतदारही आहेत. त्यांच्यावर कणकवलीत डिसेंबरमध्ये हल्ला झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली आहे. आता नितेश राणे यांच्यावर सतीश सावंत यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे हे ‘सुपारीबाज’ आमदार असल्याचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे. ते कणकवली येथे बोलत होते. नितेश राणे यांनी सातपुते याला सुपारी देऊनच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!