🕒 1 min read
नवी दिल्ली: बुधवारी ईडीने गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. आता प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक, आप्तीष्ट यांच्यावर कारवाई होतच असतात. आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात.राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया २०२४ पर्यंत आम्ही सहन करु. त्यांचा सर्च आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या? त्यामुळे हा एक खेळ सुरु आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील ४,३०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी एचडीआयएल ईडीसह इतर काहींची ईडी चौकशी करत आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीनंतर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “शिखरला ७.५ करोड पेक्षा कमीत निवडले गेले तर आश्चर्य होईल” माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
- नितेश राणेंच्या अटकेनंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल, जाणून घ्या काय आहे या फोटो मागचे सत्य
- “विरोधी पक्षाने त्याचे भांडवल करायचे ठरवले असेल तर..”, परमबीर सिंहांच्या आरोपानंतर राऊतांची प्रतिक्रिया
- महेंद्रसिंग धोनीचा नवीन अवतार पाहिलात का? ; फोटो व्हायरल
- ममता बॅनर्जीना मोठा धक्का! भाजपच्या तक्रारीनंतर न्यायालयात राहावे लागणार हजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
