Share

“काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं”; राज ठाकरे निवडणुकीसाठी सज्ज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची मुंबईत (MNS leaders meeting in Mumbai) एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांचा एक नवा लूक बघायला मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या पत्नी रेश्मा टेळे या विजयी झाल्या होत्या. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते रेश्मा टेळे यांचा मुंबईतल्या एमआयजी क्लब इथं सत्कार करण्यात आला. यावेळी रेश्मा टेळे यांनी राज ठाकरे यांना भेट म्हणून घोंगडी आणि काठी दिली.

या नंतर रेश्मा टेळे तसेच इतर कार्यकर्त्यांच्या अग्रहास्तव राज ठाकरे यांनी खांद्यावर घोगंड आणि हातात काठी घेत त्यांच्याबरोबर फोटोही काढला. राज ठाकरे यांच्या या लुकची चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी साहेबाना घोंगडी आणि काठी देण्यात आली. यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!