पाकिस्तान या धर्मांद देशात अप्लसंख्यांक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात एका सतन लाल या हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सतन लाल यांच्या सिंध प्रांतातील जमिनीवर कापसाचा कारखाना सुरु करण्यात येणार होता. घोटकी जिल्ह्यातील दहार समूहातील काही समाजकंठक लोकांनी या हिंदू व्यापारी सतन लाल याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
सतन लाल यांच्या जमिनीवर कापसाच्या तसेच पिठाच्या गिरणीच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावेळी दहार समूहातील काही समाजकंठकांनी सतन लाल यांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांना दिली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या हत्येनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक संतप्त नागरिकांनी हत्येचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन केलं.
अगोदर या कार्यक्रमाच्या आनंदाप्रित्यर्थ आतषबाजी म्हणून कुणीतरी गोळीबार करत असल्याचं अनेकांना वाटलं. मात्र काही क्षणांतच व्यापारी सतन लाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला. अज्ञात मारेकरी गोळीबार करून घटनास्थळावरून पळून गेले. सतन लाल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतापलेल्या व्यापारी आणि नातेवाईकांनी रस्त्यावर येत निषेध व्यक्त केला. या भागातील वाहतूक रोखण्यात आली आणि जोरजोराने घोषणाबाजी करण्यात आली.
या आधी पण सतन लाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. ”तू हिंदू आहेस म्हणून तुला येथे राहायचा अधिकार नाही. तुला जगायचं असेल तर तू मुस्लिम हो नाहीतर कायमचा भारतात निघून जा” अश्या आशयाच्या धमक्या सतन लाल यांना गेल्या काही दिवसांपासून मिळत होत्या. मात्र मी हिंदू असलो तरी मी एक पाकिस्तानी नागरिक आहे ,हा देश माझा आहे आणि मी मेलो तरी मी याच देशात जीव सोडीन पण मी आत्मसमर्पण करणार नाही अश्या प्रकारचा विडिओ सतन लाल यांनी काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर टाकला होता.
महत्वाच्या बातम्या:
- “ठाकरेंच्या सांगण्यावरून वाझेंची नेमणूक…” परमवीर सिहांचा धक्कादायक खुलासा
- गोल्डन बॉय नीरज चोप्राला अजून एक पुरस्कारासाठी नामांकन!
- पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा, शहागंज भागातील मालमत्ता धारकांना औरंगाबाद मनपाचा दणका; केली ‘ही’ कारवाई!
- ‘भारताने अर्थव्यवस्थेच्या बळावर जगाचे लक्ष वेधले’; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
- रतन टाटांनी केले एअर इंडियात प्रवाशांचे स्वागत…


