Share

‘अर्थसंकल्पाचा संदेश गावोगावी पोहोचवणार’; चंद्रकांत पाटलांचे विधान

Published On: 

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. मात्र भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कामगिरीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, भारताचा जीडीपी (GDP) २ लाख ३० हजार कोटींच्या आसपास आहे. सध्या भारताचे परकीय चलन साठा ६३० अब्ज डॉलर पार झाला आहे. २०१३-२०१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी इतकी होती. आज भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. गेल्या सात वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

या पार्श्वभूमीवर राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे, हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव मोदीजींनी समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. तसेच आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगावी पोहोचवतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!