पुणे: शिवसेनेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते गजानन बाबर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. पुण्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बाबर मावळ मतदार संघाच्या २००९ च्या स्थापनेनंतर तेथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांचे विशेष काम होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर ते तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. तसेच ते दोन वेळा विधानसभेवर देखील निवडून गेले होते. शिवसेनेने २०१४ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या:
- मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
- चक्क रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खाताना दिसली उर्फी जावेद, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
- “मी सचिनला बॉलिंग करायला घाबरायचो”; ब्रेटलीने केला मोठा खुलासा
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
- अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

