🕒 1 min read
मुंबई : आयपीएलचा हा १५ वा हंगाम असणार आहे. जागतिक क्रिकेटमधील काही दिग्गज स्टार्स या स्पर्धेसाठी एकत्र येणार आहेत. ऑक्शनसाठी नोंदणी केलेल्या ५९० खेळाडूंपैकी २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ असोसिएट नेशन्सचे खेळाडू आहेत. १२ आणि १३ रोजी बंगलोर येथे ऑक्शन होणार आहे.
खेळाडूंच्या नावासह आयपीएलमध्ये असणाऱ्या संघांचे बजेटही जाहीर झाले आहे. ऑक्शन आधी प्रत्येक संघाला ९० करोड रुपये देण्यात आले होते. ज्यातून त्यांनी आधीच काही खेळाडूंना रिटेन केले आहे. तर उरलेले बजेट पुढील प्रमाणे आहे. पंजाब किंग्स – ७२ , सनरायझर्स हैद्राबाद – ६८ , राजस्थान रॉयल्स – ६२ , रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – ५७ , मुंबई इंडियन्स -४८ , चेन्नई सुपर किंग्स -४८, कोलकता नाईट रायडर्स – ४८ , दिल्ली कॅपिटल्स – ४७. ५०, लखनऊ सुपरजाईंट्स – ५९ , अहमदाबाद – ५२ अशा या १० संघाचे बजेट असणार आहे.
The ~battle~ baton lines have been drawn! #IPL2022 ????
Which team’s strategy do you #Believe has been the best so far ahead of the mega auction?#IPLAuction #IPL pic.twitter.com/wdSIEr0nWf
— Star Sports (@StarSportsIndia) January 24, 2022
श्रेयस अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, फाफ डु प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन ते वानिंदू हसरंगा असे काही मोठे नाव ऑक्शनमध्ये उतरणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मी सरेंडर होण्यासाठी कोर्टात जातोय’ – नितेश राणे
- यंदाच्या अर्थसंकल्पात विषमता, बेरोजगारी, गरिबीकडे दुर्लक्ष; दिवसागणिक भयावहता वाढणार..!
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्याकडे राजकीय डोळा
- “गेली २५ वर्षे शिवसेना बाजीरावकी करतेय”, भातखळकरांचा राऊतांना टोला
- २ कोटी रोजगारांच्या घोषणेवरून राज्यसभेत भाजपला घेरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
