Share

सूर्यकुमार यादवने घेतली धोनीची आवडती चारचाकी गाडी

Published On: 

🕒 1 min read

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक नवीन कार खरेदी केली आहे. भारतीय एकदिवसीय संघाचा आणि  मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने ‘निसान जोंगा’ ही नवीन चारचाकी घेतली आहे.  त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या कारसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. सूर्यकुमार यादव याने घेतलेली निसान जोंगा ही चारचाकी एसयूव्ही प्रकारातली असून भारतात या चारचाकी गाडीची किंमत १० लाख पासून पुढे सुरु होते.

इंस्टाग्रामद्वारे सूर्यकुमार यादवने ही नवीन चारचाकी विकत घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. इन्स्ट्राग्रामवर आपल्या नवीन गाडीचा फोटो टाकत त्याने खाली ” माझ्या कुटुंबातील भल्यामोठ्या नव्या खेळण्याला सगळ्यांनी hello म्हणा” असे कॅप्शन दिले आहे. सूर्यकुमार यादवने विकत घेतलेल्या या नवीन चारचाकीचे भारतीय आर्मीशी आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्याशी वेगळं नात आहे. भारतीय लष्कर विशेष मोहिमांसाठी निसान जोंगा ही चारचाकी वापरत असत. भारतीय लष्करातर्फे मोठ्या प्रमाणात या चारचाकी गाडीचा वापर करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी ही चारचाकी गाडी सामान्य माणसांसाठी वापरायाला उपलब्ध नव्हती . मात्र सामान्य लोकांसाठी ही गाडी जेव्हा उपलब्ध करून देण्यात आली तेव्हा महेंद्र सिंह धोनी याने ही चारचाकी गाडी विकत घेतली होती. महेंद्र सिंह धोनीकडे गडद हिरव्या रंगाची निसान जोंगा आहे, तर सूर्यकुमार यादवने पोपटी रंगाची निसान जोंगा एसयूव्ही विकत घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!