नागपूर : नागपूर पोलिसांनी मंगळवारी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये विद्यार्थ्यांना भडकावल्याबद्दल युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊच्या नावाचा सुद्धा समावेश केला आहे. सोमवारी नागपूरच्या अजनी भागात काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षांविरोधात प्रदर्शने केली. त्यावेळी दंगा झाला आणि तिथे काही गाड्या विद्यार्थ्यांनी फोडल्या होत्या.
धारावी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला सोमवारी धारावीत झालेल्या आंदोलनाप्रकरणी अटक केली होती. कोर्टाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊने कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे. माझा व्हिडिओ येईपर्यंत कुणीही आंदोलन करु नये, असा संदेश वकीलांतर्फे हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना दिला आहे. काही विद्यार्थी हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी आंदोलन करणार होते.
आता नागपूर पोलीस देखील हिंदुस्थानी भाऊला ताब्यात घेणार आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली. नागपुरात झालेल्या दंग्यात हिंदुस्थानी भाऊचा हात असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात मुंबई, नागपूर, जळगाव आणि औरंगाबादमध्ये निदर्शने झाली. त्यात मुंबई आणि नागपूरमध्ये या निदर्शनांना हिंसक वळण आले. पण जळगाव आणि औरंगाबादमधील निदर्शने शांततेत पार पडली. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत व्हिडीओ टाकून हिंदुस्थानी भाऊने अफवा पसरवली होती. त्यामुळे ही निदर्शने झाली.
महत्वाच्या बातम्या:
- “सुपरमार्केट मध्ये वाईन विकण्याचा निर्णय…”; शरद पवारांचे मोठे विधान
- सर्वांचा विकास हाच मोदी सरकारचा ध्यास; शेतीला सोयीसुविधा देणारा अर्थसंकल्प-रमेश कराड
- मुंबईत कॉंग्रेस – भाजप आमने सामने; प्रसाद लाड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
- दादाच्या शो मध्ये येणार “काचा बदाम” फेम भुबम ; व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेत
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसीचे रूग्णालय उभारणार-कामगार मंत्री हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

