🕒 1 min read
मुंबई : सर्वाना खळखळून हसायला लावणाऱ्या तसेच घरोघरी लोकप्रिय असलेल्या चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोचे विनोदवीर कुशल बद्रिके (Bhau Kadam) आणि भाऊ कदम (Kushal Badrike) यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मात्र त्यांना सेटवर अटक करण्यासाठी पोलीस आल्याने सगळयांना धक्का बसला.
दरम्यान झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या शोला महाराष्ट्रातून खूप लोकप्रियता मिळते आहे. या शोमध्ये भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), निलेश साबळे (Nilesh Sable), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) हे कलाकार घराघरात पोहचले आहेत. मात्र या शोमधील भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांच्या जोडीला अटक करण्यासाठी जेव्हा सेटवर पोलिस आले, त्यानंतर त्यांची विचारणा करण्यात आली.
काय आहे नेमकं प्रकरण
चला हवा येऊ द्या च्या सेटवर भाऊ आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पांडू सिनेमात पोलिसांची टिंगलटवाळी केल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे समजते आहे. भाऊ आणि कुशल या दोघांनी पांडू चित्रपटात पोलिसांची भूमिका वठविली आहे. सेटवर अनेक कलाकार स्क्रीप्टसह तयारी करत बसलेले असताना पोलीस सेटवर आले. अचानक काय झाले म्हणून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सेटवर आलेल्या पोलिसांनी भाऊ आणि कुशल विरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याचे सांगितले. तसेच दिवसरात्र आम्ही मेहनत करतो, नागरिकांची सुरक्षा करतो, त्यांच्या नावाने टिंगलटवाळी करता, शोभते का तुम्हाला म्हणत पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला यावं लागेल असं म्हणाले.
त्यामुळे या दोघांना सेटवरुन बाहेर जावं लागलं. सेटच्या बाहेर या अभिनेत्यांचे पोलिसांसोबत चर्चा झाली. यानंतर ते सेटवर परतले. भाऊ आणि कुशलने आपली बाजू पोलिसांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी आणि या दोन्ही अभिनेत्यांचे बोलणे सुरु असतानाच निलेश साबळेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

अशी केली गंमत
सगळा प्रकार लक्षात घेऊन शेवटी एक आवाज येतो आणि ‘तुम्हाला काय वाटलं पोलीस तुम्हाला घेऊन जातील का? घाबरु नका, हे खरे पोलीस नाही. हा प्रँक आहे, असे कार्यक्रमाचा दिग्दर्शक निलेश साबळेने सांगितले. यानंतर भाऊ आणि कुशल यांनी एकदम सुटकेचा श्वास घेतला आला.
हा सर्व प्रकार कार्यक्रमाचाच एक भाग आहे. हा प्रँकचा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. त्यानंतर भाऊ आणि कुशलने त्यांच्यावर अचानक असा प्रसंग ओढावल्यानंतर कशी तारांबळ उडाली हे त्यांनी व्यक्त केलं. त्यानंतर आमची तयारी झाली, पहिला फोन दिग्दर्शक विजू मानेंना करावा का, पुढे काय करावं ही सगळी धावपळ या व्हिडीओत दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “आरसीबीने माझे…” ; विराट कोहलीचे भावनिक वक्तव्य
- जित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- “वहिनीसाहेब आवरा स्वतः ला, अन्यथा मानसिक…”,रुपाली पाटलांची अमृता फडणवीसांवर टीका
- बजेटबाबत चेतन भगत यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणुका असताना…
- “अर्थसंकल्प निराशाजनक…”; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
