Share

“आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, असा इशारा संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी दिला आहे.

“एखाद्या राज्याच्या प्रगतीने आमच्या पोटात दुखण्याची आवश्यकता नाही पण ते करण्यासाठी मुंबईची धूळधाण करणं चालू आहे. मुंबई देशाला सव्वा दोन लाख कोटी रुपये देते. त्यामुळे आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका नाही तर मुंबईचे ते पैसे परत करा”, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

दरम्यान गुजरातच्या गांधीनगरमध्ये उभारली जाणारी गिफ्ट सिटी (Gift City project in Gujarat)ही नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्यात येणार आहे. दरम्यान सध्या मुंबईत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र कार्यरत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी लवाद केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु, आता गुजरातमध्ये नवे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभे राहिल्यास मुंबईला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने यापूर्वी घेतला होता. त्यावेळी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याची घोषणा केली होती.परंतु २०१४ मध्ये केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला होता. आता आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राच्या रुपाने पुन्हा एकदा गुजरातकडून मुंबईसमोर आव्हान निर्माण उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरच संजय राऊत यांनी केंद्राने आमच्या पैशावर बाजीरावकी करू नये असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!