मुंबई: १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या १५व्या हंगामाचे मेगा ऑक्शन होणार आहे. बँगलोर मध्ये होणाऱ्या या ऑक्शनमध्ये ५९० खेळाडूंपैकी २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ असोसिएट नेशन्सचे खेळाडू आहेत. मात्र यात भारताचे एस श्रीशांत आणि अमित मिश्रा यांचे नाव वयस्कर खेळाडू म्हणून असणार आहे.
अमित मिश्राचे वय ३९ वर्षे आहे. तर एस श्रीशांतही ३८ वर्षांचा आहे. गेल्या वर्षीही श्रीशांतने आयपीएलमध्ये स्वतःची नोंदणी केली होती. पण त्याला शॉर्टलिस्ट करण्यात आले नव्हते. यावेळी त्याने पुन्हा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे आणि तो आता नव्या संघात खेळण्यासाठी ऑक्शन मध्ये शामिल झाला आहे. महेंद्रसिंग धोनीचे वयही ३८ आहे. मात्र तो ऑक्शनच्या यादीत नाहीये.
यंदा आयपीएल मध्ये दोन नवीन संघाचा समावेश झाला आहेत. तसेच मेगा ऑक्शन असल्याने मोठ्या संख्येने खेळाडू ऑक्शनसाठी निवडले जाणार आहेत. आयपीएलसाठी मुंबईतील तीन स्टेडियम निवडण्यात आले आहे. मात्र यात विशेष बाब हि असेल कि एस श्रीशांतला यावेळी तरी खेळण्याची संधी मिळेल का . मॅच फिक्सिंगच्या घटनेनंतर त्याने जास्त घरेलू सामने खेळलेले नाहीत. त्यामुळे त्याच्या निवडीबाबत अजूनही संभ्रम आहे.
महत्वाच्या बातम्या
- “विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे…”, संदीप देशपांडेंची ‘हिंदुस्थानी भाऊ’ प्रकरणावर प्रतिक्रिया
- “… आणि माही भाई म्हणाले चिल कर ” ; युझीला आठवला माहिने दिलेला सल्ला
- भाजप नेत्याच्या गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू; आंदोलनानंतर डीएमने दिले चौकशीचे आदेश
- “अर्थसंकल्पापूर्वी केंद्र आयोजित बैठकांमध्ये राज्यातर्फे कोणीही सहभागी का नाही झाले?”, भागवत कराडांचा अजित पवारांना सवाल
- “राज ठाकरे मला बघून म्हटले ये धर्मेंद्र…”; रुपाली पाटलांनी सांगितला मनसेच्या आंदोलनातील किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

