मुंबई: मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास फाटक याच्या अफवेला बळी पडून शेकडो विद्यार्थ्यांनी ‘दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊ नये’, या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आंदोलन केले. (After the rumor of Hindustani Bhau, student aggression) त्यामुळे मुख्य सूत्रधार म्हणून हिंदुस्थानी भाऊला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आता यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे (Nase leader Sandeep Deshpande) यांनी थेट विद्यार्थी संघटनाबाबत प्रश्न उभे केले आहेत.
“कोण कुठला भाऊ, त्याच्या सांगण्यावरून एवढी मुलं जमा होतात आणि कुठल्याच विदयार्थी संघटनांना पत्ता नसतो. हे सर्वच विद्यार्थी संघटनांनी (student union) गंभीर्यानी घ्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे कुठल्यातरी वैचारिक बैठक नसलेल्या माणसाच्या पाठी विद्यार्थी जात आहेत.”, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
कोण कुठला भाऊ,त्याच्या सांगण्यावरून एवढी मुलं जमा होतात आणि कुठल्याच विदयार्थी संघटनांना पत्ता नसतो.हे सर्वच विद्यार्थी संघटनांनी गंभीर्यानी घ्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे कुठल्यातरी वैचारिक बैठक नसलेल्या माणसाच्या पाठी विद्यार्थी जात आहेत.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022
दरम्यान भाऊविरुद्ध नागपुरातही गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे नागपूर पोलीस त्याला अटक करून नागपुरात आणणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच आंदोलनात सहभागी युवकांविरूद्ध पोलीस कारवाई करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओद्वारे पोलीस युवकांचा शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “अर्थसंकल्पापूर्वी केंद्र आयोजित बैठकांमध्ये राज्यातर्फे कोणीही सहभागी का नाही झाले?”, भागवत कराडांचा अजित पवारांना सवाल
- “राज ठाकरे मला बघून म्हटले ये धर्मेंद्र…”; रुपाली पाटलांनी सांगितला मनसेच्या आंदोलनातील किस्सा
- “आरसीबीने माझे…” ; विराट कोहलीचे भावनिक वक्तव्य
- अजित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील १६ भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
- “वहिनीसाहेब आवरा स्वतः ला, अन्यथा मानसिक…”,रुपाली पाटलांची अमृता फडणवीसांवर टीका


