Share

ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची सही; अजित पवारांची माहिती

Published On: 

मुंबई: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation)विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal), मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेटही घेतली आहे.

दरम्यान राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे ( Governor signature on OBC reservation bill)आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील हे स्पष्ट झाले आहे. “राज्यपालांनी अध्यादेशावर सही केली असून याचं बिलात रुपांतर करत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने बिल मंजूर केलं आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांनी तयार केलेल्या बिलावर राज्यपालांनी सही केली ही आनंदाची गोष्ट आहे.” असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्याने ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत झाला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू आणखी भक्कम झाली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये ५० टक्यांच्या आत आरक्षण ठेवण्याच्या अटीला देखील बळ मिळाले आहे. यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!