Share

“राज ठाकरे मला बघून म्हटले ये धर्मेंद्र…”; रुपाली पाटलांनी सांगितला मनसेच्या आंदोलनातील किस्सा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी झी मराठी वाहिनीतील एका कार्यक्रमात नुकताच भाग घेतला होता. त्यात त्यांनी कॉलेज जीवनातील एका आंदोलनाचा किस्सा सांगितला आहे. पुणे महानगर पालिकेतील कर्मचा-र्यांना कामावरुन काढून टाकल्याने मी पुणे महानगर पालिकेच्या चौथ्या मजल्यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला ये धर्मेंद्र म्हणून हाक मारली. असा किस्सा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

https://www.facebook.com/Rupalispeak/videos/250267963924590

रुपाली पाटील म्हणाल्या, कॉलेजमध्ये असताना लेडी डॉन टाईपमध्ये मी कॉलेजमध्ये रहायचे. दहा ते बारा मुलींची टीम होती. मुलींची टींगल टवाळी करणाऱ्यांना आम्ही धूवायचो. पुणे महानगर पालिकेच्या १२० कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकले होते. खूप प्रयत्न केला पण प्रशासन त्यांना कामावर घेण्यास तयार नव्हते. त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही पुणे महानगर पालिकेत शोले स्टाईल आंदोलन केले होते.

त्यात मी नगरपालिकेतील सुरक्षारक्षकांची नजर चुकवून महानगरपालिकेच्या छतावर गेले. चौथ्या मजल्यावर भिंतीवर उभी राहून शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत कामगारांना कामगारांना कामावर घेणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पावित्रा मी घेतला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मला बघितले आणि ये धर्मेंद्र इकडे ये, अशी हाक त्यांनी मारली. कसलं ग ते शोले स्टाईल आंदोलन करते, असे आंदोलनं करत जाऊ नको जे जीवाशी येतात. असा किस्सा रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!