Share

असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं – दीपक केसरकर

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हा दखल झाला होता. त्याप्रकरणी त्यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात (District Court) अटकपूर्व जमीन अर्ज केला होता. काल (३१ जाने.) या अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.

दरम्यान दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ट्विट करत राणे पिता-पुत्र आणि कोकणातील एकंदरीत राजकारणावर भाष्य केले. केसरकर म्हणाले, ‘एखाद्याला मारण्यासाठी माणसं पाठवणं राजकारण नाही. राजकारणासाठी ते गुन्हेगारीचा वापर करतात. जी व्यवस्था आहे तिचा वापर करणं चुकीचं आहे. असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं. त्याची सुरुवात यांनी केली आहे. त्यामुळे चांगल्या पद्दतीने तपास करण्यात आला असं मला वाटतं.

तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील या प्रकरणी आपले मत मांडले आहे. ‘कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन होत नाही. म्हणून कोर्टाने अर्ज फेटाळला असून ते आता हायकोर्टात जातील. पण त्यांना आधी शरण जावं लागेल असे परब म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!