🕒 1 min read
सांगली: राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर यावरुन टीका केली आहे. भाजपनंतर आता सांभाजी भिडे यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
सांभाजी भिडे (Sambhaji Bhide) पत्रकारांशी संवाद साधत असताना म्हणाले, या देशातील सर्व दारू संपली पाहिजे. गांजा शेतीच्या का आडवे पडायचे. चरस गांजा उत्पन्न करण्यासाठी हा समाज पुढे येईल. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळात बोलणार आहे. हा घेतलेले निर्णय समजून सांगणार आहे. राज्याने असले बोलायचे नसते. समाजाला आपण दिशा द्यायची असते. हा निर्णय संताप जनक, नाश करणारा निर्णय आहे, अशा तीव्र शब्दात संभाजी भिडे यांनी मत व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले, राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखरच चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहादूर शास्त्री जसे अफाट चांगले होते. तसेच नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आहेत. त्याचे मन मी जाणतो. त्यांनी खरोखर देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेत घटनेत दुरुस्ती करून घ्यावा, असेही भिडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थानाला ‘अ’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आराखडा तयार करा-अब्दुल सत्तार
-
औरंगाबादचा सातबारा शिवसेनेच्या नावावर आहे का? हुजरेगिरीविरोधात भाजप करणार आंदोलन..!
-
“माझ्या ब्राचं माप देव घेतोय”; वादग्रस्त वक्तव्यानंतर श्वेता तिवारीने मागितली माफी
-
“रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवणे रिस्की आहे..”; सबा करीम यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
