Share

बीडमध्ये अभियंत्याची स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी; पंकजा मुंडें म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. आता पंकजा मुंडेनी केलेले एक ट्वीट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी बीडमधील माफिया घटनेवरून सत्ताधारी पक्षाला निशाण्यावर धरले आहे.

“बीड जिल्ह्य़ात एका कार्यकारी अभियंत्याने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली, किती दुर्दैवी! बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहे, यांची वैधानिक दखल घ्यावी.” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

तसेच या प्रश्नाची वैधानिक दखल घ्यावी अशी विनंती करत त्यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. एकंदरीत पंकजा मुंडे यांनी बीडमधील राजकारण, गुन्हेगारी व एकूण सद्य परिस्थितीवर आधारित ट्वीट करत निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!