🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athavale) यांनी भाजपला एक ऑफर दिली आहे. यामुळे एका वेगळ्याच राजकीय चर्चांना उधान आले आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी’, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
नाशिक येथे रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले.भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा युती करावी,असे ते म्हणाले आहेत. ‘निवडणूक प्रचारात देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस असा भाजपचा प्रचार होता. पण तेव्हा सेनेने आक्षेप घेतला नाही. पण निकालानंतर आकडे आले तेव्हा आपल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही हे लक्षात आल्यावर सेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट धरला. तेव्हा सेनेचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फार्म्युला भाजपने फेटाळला, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरे आणि आमचे घरचे संबध आहे. भीम शक्ती व शिव शक्ती एकत्र आली होती. उद्धव ठाकरे यांनी लवकर बरे होऊन कोरोना विरोधात दंड थोपटावे’. असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- विधानसभा निवडणुकींचे निर्बंध लागू होण्यापूर्वीच भाजपने घेतल्या ३९९ प्रचार सभा
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फरार पण, उपमुख्यमंत्री कुठे?”,पवारांच्या बैठकीवरून भातखळकरांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
