🕒 1 min read
मुंबई : मागील दोन-तीन दिवसांपासून शिवसेना आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या नगरसेवक किंवा नेत्यांना तिकीट देणार नसल्याच्या बातम्या बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray)यांनी शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला. परंतु यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’बहुधा मुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील असेच अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का?’, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.
बहुधा मुख्यमंत्री पद आणि कॅबिनेट मंत्री पद देखील असेच अहोरात्र मेहनत करणाऱ्यांनाच मिळते का? pic.twitter.com/Qmit082tjD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 11, 2022
दरम्यान, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले २-३ दिवस मी काही बातम्या बघत आहे. या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं’,असे आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
