🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संपबाबत काल बैठक घेतली. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा, संप मागे घ्या. मागण्या मान्य होतील. असे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा’, अशी टीका परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल, असे ठामपणे आश्वासित करावं, जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचंय”
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
