🕒 1 min read
नवी दिल्ली: अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूद (Malvika Sood)सच्चर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहावयास मिळत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत मालविका सूद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबाबत चरणजीतसिंग चन्नी यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
दरम्यान मालविका यांना मोगा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेतही यावेळी देण्यात आले.सोनू सूद यानेच नोव्हेंबर महिन्यात घोषणा करत त्याची बहीण राजकारणात उतरणार व विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता काँग्रेस पक्षात प्रवेश करून मालविका यांनी पंजाबमध्ये मोठी राजकीय हालचाल केली आहे.
https://twitter.com/CHARANJITCHANNI/status/1480504729490771975?t=o_uR02vd_g_yAx-F9IJBeQ&s=08
दरम्यान यानंतर पत्रकार परिषदेत सोनू सूद बहिणीच्या प्रचारात उतरणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. लॉकडाऊन काळात सोनुने केलेल्या सामाजिक कार्याची प्र्चीती सर्वांनाच आहे. आता मालविका यांच्यानंतर सोनूही राजकारणात उतरणार का, याबातही आता चर्चा रंगताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाहुबली’तील ‘कटप्पा’ ला कोरोनाची लागण
- “शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा आझाद मैदानावर जाऊन संप मिटवा”, पडळकरांचा परबांना सल्ला
- प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह ; ICU मध्ये दाखल
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- “…ते उत्तर प्रदेशात होऊ शकते, जर आठवलेंनी मध्यस्ती केली तर”, ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
