Share

“तुमच्या गाऊन घालण्याच्या हट्टापायी…”; फडणवीसांचा उदय सामंतांना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नवीन विद्यापीठ विधेयकावरून (University Bill) फडणवीसांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. “आता सगळ्या प्रकारचे शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकार मंत्र्यांनी घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आणलेला विद्यापीठ कायदा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. त्यामुळे या कायद्यामुळे राज्यपालही कटपुतळी बनतील,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“विद्यापीठ विधेयकाचा जो काळा कायदा या सरकारने पास केला. अर्ध्या रात्री चर्चा थांबवून, बेकायदेशीरपणे हे विधेयक पास करण्यात आले. या काळ्या विधेयकामुळे आमची विद्यापीठ ही राजकारणाचा अड्डा बनणार आहेत. या विद्यापीठामध्ये घोटाळे पहायला मिळणार आहेत. शिवसेनेची आपले वाद असतील पण मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मनात विद्यार्थांच भल व्हाव, अशी इच्छा असेल. पण परवा जो कायदा त्यांनी पास करुन घेतला मी अक्षरशा निराश झालो. त्यामुळे या सत्ता पक्षामध्ये विद्यार्थ्यांचे हित पाहणारा कोणीच नेता उरला नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उदय सामंतांना खोचक टोला

“२०१६ साली जे विधेयक आपण पास केलं होत. देशातील, राज्यातील शिक्षणतज्ञांनी एकत्र येऊन त्याचा मसुदा तयार केला त्यानंतर यावर आपण संयुक्त निवड समिती तयार केली यामध्ये सर्व पक्षाचे नेते होते. त्यानंतर तो कायदा तयार केला. त्या कायद्याला संपवण्याचे काम हे सरकार करत आहे. सरकारने आणलेल्या नवीन विधेयकात उपकुलपतीची तरतुद केली आहे. उपकुलपती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री (उदय सामंत) आहेत. मी त्यांना सांगितले की जेव्हा पदवीदान समारंभ होतो. त्यावेळी ते आपल्याला गाऊन, हॅट घालतात बर वाटत. पण तुम्ही उपकुलपती न होता शिक्षणमंत्री म्हणून तिथं गेलात तरी तुम्हाला गाऊन घालायला मिळाणार आहे. तुमच्या गाऊन घालण्याच्या हट्टापायी उपकुलपतीचे पद तयार करुन आमच्या तरुणांना वेठीस धरण्याचं कारण काय आहे?”, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!