मुंबई: भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार अत्याचार, बलात्काराचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे, एका टोळीने सरकार चालवावे, असे हे सरकार चालत आहे. हे महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार राज्याच्या इतिहासातील सर्वात पळकुट, डरपोक आणि भ्रष्टाचारी सरकार आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती पहायला मिळत आहे. यामध्ये सरकारमध्ये खंडणीची, भ्रष्टाचाराची स्पर्धा लागली आहे. यांच्या नेत्यांना असे वाटते की आपले सरकार राहील की जाईल, त्यापुर्वी जेवढं खाता येईल तेवढ खावे, त्यामुळे भयानक भ्रष्टाचाराची मालिका आपल्याला पहायला मिळत आहे. मंत्र्यांपासून, आमदार ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक यामध्ये गुंतले आहेत. हिस्सेवाटीवरुन यांच्यामध्ये भांडण आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.”
राज्यात भयावह परिस्थिती
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील नोकरशाही आज भ्रष्ट होत आहे, या गोष्टीची मला चिंता आहे. त्यामुळे आता संघर्ष अटळ आहे. जनतेला हे सरकार मान्य नाही. युवकांच्या संदर्भात भयावह परिस्थिती राज्यात आहे. परीक्षा घोटाळे समोर या घोटाळ्याचा थेट सरकारशी सबंध आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना हे सरकार फसवत आहे. हे विद्यार्थी जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा त्यांना माहित नसत की मंत्रालयातील कोणत्यातरी नालायकांनी पैसे खावून परीक्षा मॅनेज केली आहे. त्यामुळे पैसे असलेले विद्यार्थी पास होतात, हे जेव्हा विद्यार्थ्यांना समजत, तेव्हा त्याच्या मनावर झालेल्या परिणामाची कल्पना देखील करता येत नाही.”
महत्वाच्या बातम्या –
- लॉकडाऊन नको, तूर्तास निर्बंध कडक करणार-अजित पवार
- कोरोनाला आळा घालण्यासाठी ऑग्युमेटेंड रिस्ट्रिक्शनचा पर्याय? राजेश टोपेंचे स्पष्टीकरण
- युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात; सत्तारांच्या युतीच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे संतापले..!
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक; उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना
- “अमाप माया सोबत घेऊनी, माय चालली अनाथ करुनी!”, सदाभाऊंची भावनिक पोस्ट


