🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचेही मलिकांनी सांगितले.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं. त्याच सोबत निवडणुकांची पूर्वतयारी देखील पक्षाने केली असल्याचेही मलिकांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भारताच्या इतिहासातील शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वात ‘असंवेदशील’ केंद्र सरकार- आ. सतिश चव्हाण
- लॉकडाऊन नको, तूर्तास निर्बंध कडक करणार-अजित पवार
- बॉलिवूड गायक सोनू निगमला कोरोनाची लागण; पत्नी, मुलगा देखील पॉझिटिव्ह
- कोरोनाला आळा घालण्यासाठी ऑग्युमेटेंड रिस्ट्रिक्शनचा पर्याय? राजेश टोपेंचे स्पष्टीकरण
- युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात; सत्तारांच्या युतीच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे संतापले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
