Share

“मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरु, याचं श्रेय राज्यपालांना…”, रावसाहेब दानवेंचा टोला

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याचा आजार असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाही. यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरुये, याचं श्रेय राज्यपालांना जाते, राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

रावसाहेब दानवेंनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय राज्यपालांना व या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेला जातं. सरकारला नाही नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विरोधकांवर टीका केली होती. त्यानंतर विरोधकांनीही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!