मुंबई: कालपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आणि पहिल्याच दिवशी मुलांनी लसीकरणास चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी तब्बल १ लाख ७६ हजार लसीकरणाची नोंद झाली. तर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात कमी प्रतिसाद लाभला आहे.
दरम्यान राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच आता राज्यातील शाळाही ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर देशात झारखंड येथे कोरोनामुळे मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे राज्यावरही लॉकडाऊनचे दाट सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज विद्यापीठसंबंधी निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक बोलावली आहे. तसेच जर कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडी सरकार निर्णय घेणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘माफी मागितली की आपण नवीन घोळ घालायला मोकळे असंच ना?’, भातखळकरांचे टीकास्त्र
- संजय राऊतांनी शिवसेनेच्या औकातीचे दर्शन देशाला घडविले; भातखळकरांचा हल्लाबोल
- “अडीच लाख मानधन, २.९ कोटींची मालमत्ता, मग तुम्ही मजूर कसे?”, दरेकरांना सहकार विभागाचा सवाल
- ‘पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मागायची आणि…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- भाजप नेते अतुल भातखळकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
