Share

संजय राऊतांनी शिवसेनेच्या औकातीचे दर्शन देशाला घडविले; भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे. चीन सरकारने भारताच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे. गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले. ध्वज फडकविला, त्यांचे राष्ट्रगीत गायले. व्हॅलीत फलकही लावले की, ‘आम्ही आमची एक इंच भूमीही सोडणार नाही.’ हा व्हिडिओ संजय राऊत यांनी रीट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच आजच्या सामना अग्रलेखातूनही राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान राऊत यांना अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे. “चीन सरकारच्या मीडिया हाऊसचा गलवान खोऱ्यात चिनी सैनिक त्यांचा राष्ट्र ध्वज फडकवत असल्याचे ट्विट संजय राऊत यांनी रिट्विट करून शिवसेनेच्या औकातीचे दर्शन देशाला घडविले आहे. मोदी सरकारच्या आत्यंतिक द्वेषापायी कमरेचे कपाळाला बांधणाऱ्या शिवसेनेला जनता धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही.” असा इशारा अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत दिला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी यावरूनच केंद्र सरकारला सामना अग्रलेखातून सवाल केला आहे की, “गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित २० भारतीय जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत ज्यांचा झेंडा फडकायचा तो फडकेल. सत्ता, दहशत, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज हाती असल्यावर विजयाचे झेंडे सहज फडकविता येतात, पण गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार, यावर काय ते बोला!” असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!