Share

‘माफी मागितली की आपण नवीन घोळ घालायला मोकळे असंच ना?’, भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : म्हाडाच्या (MHADA exam) परीक्षेत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार क्लस्ट ६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला २९ आणि ३० जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन परीक्षा होणार होती. परंतु २९ जाने. रोजीच एमपीएससीची परीक्षादेखील होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची माफी मागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी एक दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आव्हाडांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’म्हाडा परीक्षेच्या तारखेत बदल केल्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. प्रत्येक परीक्षेत घोळ घालायचे आणि नंतर निर्लज्जपणे विद्यार्थ्यांची माफी मागायची.’ तसेच माफी मागितली की आपण नवीन घोळ घालायला मोकळे असंच ना?, असा खोचक सवालही भातखळकरांनी केला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे की,’म्हाडाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहेत. पण एका तारखेत बदल करावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक परीक्षा रद्द केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि म्हाडाच्या प्राधिकरणाची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. खरंतर एमपीएससीने तपासायला पाहिजे होते. कुठल्या विभागाने कुठल्या ठिकाणी परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे यावर वाद न घालता. एक दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!