मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतानाच आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे. “माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन करणारे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 4, 2022
दरम्यान, आज(४ जाने.)सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तर आत्तापर्यंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील आदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- विद्यापीठ, कॉलेज सुरु की बंद? उदय सामंतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
- पुणे जिल्हा बँकेची आज मतमोजणी; अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला
- पुण्यात निर्बंध अजून कडक होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
- ‘..तरी चीनचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांबरोबर फाफडा, ढोकळा खाताना दिसतील’, संजय राऊतांचा टोला
- ब्रेकिंग! प्रविण दरेकर मुंबै बँक संचालक पदासाठी अपात्र

