Share

‘पंतप्रधान मोदींच्या नावावर मते मागायची आणि…’, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या गोव्यात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी सारखा प्रयोग करायचा म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करायची. मोदीजींच्या नावावर मते मागायची आणि निवडणुकीनंतर भाजपचा विश्वासघात करायचा. पण हे आता शक्य नाही. तुमचे रंग पाहिलेत आम्ही’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांच्या भेटीसंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आज गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली. दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसेच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. गोव्यात महाराष्ट्रा प्रमाणे महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का ? यावर चर्चा झाली’, असे राऊत यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!