🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) २ जानेवारी रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. असे राज्य सरकारने स्पष्ट कले आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘रद्द परीक्षा, रद्दी सरकार…’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ट्विट करत म्हंटले, राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत दिली आहे.
रद्द परीक्षा, रद्दी सरकार… pic.twitter.com/URR05HDwRj
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2021
परीक्षा लांबणीवर टाकताना, परीक्षाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. कोरोना महामारीत शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. या उमेदवारांची शासकीय सेवेची दारंदेखील बंद झाली होती. पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी एक आदेशही जारी करण्यात आला होता. त्यानंतर अखेर राज्य लोकसेवा आयोगानं एक पत्रक जारी करत अर्ज केव्हा भरता येतील याबाबत माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम
- “आठवले आंबेडकरी चळवळीला लागलेले कलंक” आनंदराज आंबेडकरांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
