🕒 1 min read
मुंबई : आपल्या व्हायरल व्हिडीओवरून नेहमीच चर्चेत असणारे कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरुन ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली आहे.
“कालीचरण महाराज हे मूळचे अकोल्याचे आहेत. कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात ते गरळ ओकत असतात आणि ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरवण्याचे काम करत असतात. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोव अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा. ते सनातनी आहेत. निवडणुकीला उभे राहिले 247 मत मिळाली”, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत कालीचरण महाराज यांच्या अटकेची मागणी केली आहे.
हा कलीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे
कधी आरक्षण कधी मुस्लिम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि याऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करततो
अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा
हा सनातनी आहे
निवडणुकीला उभा राहिला 247 मत्त मिळाली pic.twitter.com/Xybsp97kyk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2021
दरम्यान, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मविआ सरकार प्रत्येक विषयात घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल- चंद्रकांत पाटील
- विधानसभेत पुन्हा गदारोळ: “तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव”
- नितेश राणेंच्या अटकेबाबत संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
- दोषी कोणी असो कारवाई व्हायलाच हवी- केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
