Share

पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : आज(२६ डिसें.) सोशल मीडियावर एका रणरागिणीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले. हा व्हायरल झालेला फोटो महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांचा असून तृप्ती ह्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil) यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती यांनी केल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’लडकी हू लढना जानती हु ! सिंधुदुर्ग दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी केले. आदरणीय पवार साहेबांनी महिलाना नेहमी संधी दिली, अजित दादांनी आज महिला भगिनीवर पुन्हा विश्वास दाखवुन तोच वारसा यशस्वी चालवत असल्याचे सिद्ध केले आहे’, असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार , उदय सामंत आणि सतेज पाटील हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु तिन्ही मंत्र्यांचे सारथ्य एक महिला कॉन्स्टेबल करत होती, या गोष्टीने सर्वांना आश्चर्यचकित केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!