🕒 1 min read
बुलडाणा : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला दिसत नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आजच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र तरीही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य केले आहे.
नाना पटोले हे आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या दौऱ्यावर आहेत. शेगाव येथून खामगावकडे येत असताना त्यांनी रस्त्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना निवेदन दिले आहे.
मी खुर्चीत असतो तर एसटी आंदोलन (ST Strike) इतके दिवस चाललं नसतं, असे भाष्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. यावर कर्मचाऱ्यांनीही नाना पटोले यांना प्रतिप्रश्न केला आहे.
‘आता ही आपण सत्तेत आहात आपण करू शकता’ अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना दिली आहे. यावर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, ‘आम्ही सत्तेत असलो तरी आमची सत्तेतील आस का आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे, नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन एसटी कर्मचारी संभ्रमात पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी आणि आरएसएसचे संबंध कोणापासून लपलेले नाहीत; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
- बडतर्फीची कारवाई अधिक तीव्र करणार; अनिल परब यांचा इशारा
- “लोकशाहीच्या परंपरेचं पालन राज्यकर्ते करतीलच पण राज्यपाल…”
- ‘माझ्या हत्येचा कट, यात जयंत पाटील, पोलीस अधिकारीही सामिल’
- सलमान खानला फार्महाऊसवर सर्पदंश; एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
