Share

“लोकशाहीच्या परंपरेचं पालन राज्यकर्ते करतीलच पण राज्यपाल…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagar Sigh Koshyari) यांच्यात सध्या राजकीय संघर्ष सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावरून राज्यात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोणत्या फाईलवर सही करायची हा अधिकार सर्वस्वी महामहीम राज्यपालांचा असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांचे पालन राज्यकर्ते करतील. राज्यपालांनी पण केले पाहिजे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राज्यपालांकडे गेला आहे. त्यावर राज्यपालांच्या स्वाक्षरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत दुरुस्ती करणारा प्रस्ताव सरकारने पाठवला आहे. या प्रस्तावाला भाजपनेही विरोध केला आहे. त्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्ही राज्यपालांकडे फाईल पाठवली आहे. काल मी दिवसभर पुणे दौऱ्यावर होतो, रात्री बारामती आणि सकाळी आता सिंधुदुर्गमध्ये, दुपारी रत्नागिरीला असणार आहे. संध्याकाळी मुंबईत गेल्यानंतर त्याची माहिती घेणार आहे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!