🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून 28 डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. काल या अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले.
या व्हिडिओमध्ये शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सभागृहात दाखल होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला. यावरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. यावरुन आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’वर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी जेव्हा म्याव म्यावची प्रतिक्रिया दिली त्यावर आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. शिवसेनेचे वाघ असंच म्हंटले जाते. त्यामुळे आदित्य ठाकरेंना पाहून भीती वाटली असेल म्हणून पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव आली असेल तर माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंना सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “तुमचं सरकार घोटाळेबाज होतं म्हणून तुम्हाला सगळीकडे घोटाळेच दिसतात”
- ‘अतरंगी’ फोटो शेअर करत नवाब मलिकांनी अप्रत्यक्षपणे उडवली नितेश राणेंची खिल्ली
- आ. दानवेंच्या प्रयत्नांना यश; भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयाचे होणार उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर..!
- “दुखवट्याच्या नावाखाली काही लोक एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत”
- ओबीसी आरक्षणसाठी चालढकल केल्याने भाजपचे विधिमंडळासमोर धरणे


