Share

“तुमचं सरकार घोटाळेबाज होतं म्हणून तुम्हाला सगळीकडे घोटाळेच दिसतात”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशनाची तापलेल्या वातावरणात सुरुवात झाली. सलग 3 दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी आपली बांजू मांडण्यात कमी पडले नाही तर विरोधक त्यांचे मुद्दे खोडून काढण्यात कमी पडले नाहीत.

विरोधक सातत्याने महाविकास आघाडीला घोटाळेबाज सरकार म्हणून हिणवत आहे. विरोधकांच्या या टीकेला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्ष भाजपवर जोरदारा टीका केली आहे.

विधानसभेत गदारोळ करु असे म्हणणाऱ्या विरोधकांचा बार फुसका निघाला आहे. विरोधकांचं सरकारच घोटाळेबाज होतं म्हणून त्यांना सगळीकडे घोटाळेच दिसतात, असा खोटक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी भाजप करत आहे. मात्र, स्वतःवरील कलंक पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विधानसभा आपला राग काढण्यासाठी नाही.

दरम्यान, सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसला. याशिवाय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणू, हा भाजपचा फुसका बार निघाला. भाजप स्वतः घोटाळेबाज आहे. त्यामुळेच त्यांना सगळीकडे घोटाळे दिसत आहे, अशी घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!