Share

ओबीसी आरक्षणसाठी चालढकल केल्याने भाजपचे विधिमंडळासमोर धरणे

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवरून भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’वीज देयकांबाबत शेतकऱ्यांची सुरू असलेली दिशाभूल, शेतकऱ्यांची वीज तोडण्याच्या अन्याय्य कारवाईचा निषेध आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारची चालढकल याचा माझ्या सहकारी भाजप आमदारांसह विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे देऊन निषेध केला.’

दरम्यान, पुढे अजून एक ट्विट करत ते म्हणाले की,’मविआ सरकारचा अधिवेशनातील रस हा ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करुन घेणे,१९ विधेयके संमत करून घेणे आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम डावलून आवाजी मतदान पद्धतीने घेणे यापुरताच आहे’, असे पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!