Share

वक्फ बोर्डाचा विरोध झुगारून ‘तो’ वादग्रस्त पेट्रोलपंप अखेर औरंगाबाद मनपाने पाडलाच!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे रेल्वे स्टेशन मोहल्ला परिसरातील रूमी दिनशाँ प्रिंटर पेट्रोल पंपाचे अतिक्रमण मंगळवारी (दि.२१) तोडण्यात आले. येथील पेट्रोल पंप मालक अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र न घेता तसेच मनपाची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतपणे पेट्रोल पंप चालवित होता. त्याचप्रमाणे या पेट्रोल पंपामुळे रस्ता रूंदीकरणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याचप्रमाणे वक्फ बोर्डाने ही जागा आपलाच असल्याचा दावा केला आहे. मात्र मनपाने कारवाई केलीच.

रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या या पेट्रोल पंपामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणातही या पेट्रोल पंपामुळे अडचणी निर्माण झालेल्या होत्या. या पेट्रोल पंप मालकास महानगरपालिकेने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. मनपा तर्फे यापूर्वी देण्यात आलेल्या नोटीसीच्या आधारे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालाने ३ सप्टेंबर रोजी अंतरीम आदेश दिले. या पार्श्वभूमीवर मालकास २४ तास मुदतीची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.

हर्सूल येथील अतिक्रमणावर मनपाची कारवाई

हर्सुल येथील मनपाच्या जागेवर सुमारे ३० बाय ८० फुट आकाराच्या भुखंडावर लोखंडी गर्डर टाकुन अतिक्रमण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त-२ रविंद्र निकम, उप आयुक्त अपर्णा थेटे यांच्या समवेत पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक मजहर अली, सय्यद जमशीद, पी.बी.गवळी, आर.एम. सुरासे, सागर श्रेष्ठ, रविंद्र देसाई अतिक्रमण हटाव पथकाचे पोलीस निरीक्षक फहिम हाश्मी, पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी, तसेच यांत्रिकी विभागाचे कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!