🕒 1 min read
मुंबई : शिवसेना (Shivsena) शरद पवारांच्या (Sharad Pawar) मार्गदर्शनाखाली यूपीएत (UPA) सहभागी होणार आहे. याचा मुहूर्तदेखील ठरला असून काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. यावरुन भाजपा नेते आ. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
“ज्वलंत हिंदुत्व यूपीए च्या दावणीला”, असे ट्विट करत भातखळकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1473159730856030211
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून केंद्रात भाजपाला आव्हान देण्यासाठी यूपीए स्थापन करण्याची तयारी सुरु झाली होती. आता शिवसेना यूपीएत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
राज्यात ज्याप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्रात यूपीएचं सरकार स्थापन व्हावं यासाठी शरद पवार आग्रही असल्याचे दिसून येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेना यूपीएत सहभागी होणार असल्याने केंद्रातील भाजपाची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यातील १०५ नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
- …त्यामुळे राष्ट्रपती आता वाट बघत आहेत; चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
- “संजय राऊत आणि कंपनी शिवसेनेला…”; बाळासाहेबांचा व्हिडीओ शेअर करत राम सातपुतेंची टीका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
