Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध ४९ विषयांसाठी २३१ अध्यापकांची निवड करण्यात आली आहे. तासिका तत्त्वावरील जागांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी २ हजार ३० अर्ज आले होते. यातून १५३ अध्यापकांची निवड करण्यात आली. उमेदवार न आल्यामुळे ७८ जागा रिक्त ठेवाव्या लागल्या. यासंदर्भात १७ डिसेंबरला विद्यापीठाने आदेश काढले असून त्यांना तातडीने अध्यापन करण्यास सांगण्यात आले आहे.

विद्यापीठ परिसर आणि उस्मानाबाद उपपरिसरातील विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तासिका तत्त्वावर अध्यापकांच्या नेमणुका करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. २३१ अध्यापकांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी तब्बल २ हजार ३० ऑनलाइन अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले होते. मागील वर्षी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरूंनी मुलाखती घेतल्या होत्या. यंदा मात्र उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे संबंधित विभागांमध्ये प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. ७ आणि ८ डिसेंबरला झालेल्या मुलाखतीनंतर १७ डिसेंबरला निवड यादी जाहीर करण्यात आली.

यामध्ये १५३ अध्यापकांना निवडीचे आदेश दिले आहेत. २३२ पैकी पैकी ७८ जागांवर उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. सूक्ष्मजीवशास्त्राच्या ३ जागा रिक्त होत्या, पण एकही उमेदवार मिळाला नाही. केमिकल टेक्नॉलॉजी आणि डी.एन.ए. बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटीज़ स्टडीज विभागात निवड प्रक्रिया झाली. पण विद्यापीठाला अद्याप अंतिम निवड यादी दिलेली नाही. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात शासनाने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी वाढ केली आहे. पदवी स्तरावरील अध्यापनासाठी ६२५ तर पदव्युत्तरसाठी ७५० रुपये दिले जातील. प्रात्यक्षिक अध्यापनासाठी देखील मानधन वाढले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!