🕒 1 min read
मुंबई : शिवसेना शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली यूपीएत सहभागी होणार आहे. याचा मुहूर्तदेखील ठरल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. यावरुन भाजपा आमदार राम सातपुते यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आ. राम सातपुते यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बाळासाहेब म्हणतात, ‘मै मेरे शिवसेना की काँग्रेस नही होने दुंगा, कभी नही होने दुंगा’, असे बाळासाहेब ठाकरे म्हणतात. ‘राम सातपुते म्हणाले, साहेब आपण रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना संजय राऊत आणि कंपनी सोनिया गांधींच्या दारात बांधायला निघालेत.’
मै मेरे शिवसेना की कांग्रेस कभी होने नही दूंगा
– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसाहेब आपण रक्ताचं पाणी करून उभी केलेली शिवसेना संजय राऊत आणि कंपनी सोनिया गांधींच्या दारात बांधायला निघालेत.
.@OfficeofUT @rautsanjay61 https://t.co/Y0vx5TmvXS pic.twitter.com/KiEsX4c6Sg— Ram Satpute (@RamVSatpute) December 21, 2021
शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना यूपीएत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात ज्याप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्रात यूपीएचं सरकार स्थापन व्हावं यासाठी या जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हापासून यूपीए स्थापन करुन केंद्रातील भाजपाला आव्हान देण्याच्या हलचाली सुरु झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- …पण कोरोनाची दहशत संपणार कधी?
- छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- ६८ वर्षीय महिलेची गजब याचिका; ‘लाल किल्ला माझ्या नावावर करा’
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक लोकसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
