🕒 1 min read
औरंगाबाद :प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप(Arvind Jagtap) यांचे वडील गणपतराव जगताप(Ganpatrao Jagtap) यांचा ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त सोमवारी विशेष बीजतुला औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाजत गाजत त्यांची मिरवणूकही काढण्यात आली. शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackrey) स्मृती उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलाने वडिलांच्या वाढदिवशी दिलेली ही अनोखी भेट आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली.
औरंगाबाद महानगरपालिका व सह्याद्री देवराई यांच्या वतीने महानगरपालिकेच्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह्याद्री देवराईच्या वतीने लेखक अरविंद जगताप यांचे वडील गणपतराव जगताप यांची बीजतुला करण्यात आली. देवगिरी स्वयंसेवकांनी महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगातील दुर्मिळ प्रजातींच्या झाडाचे बीज गोळा करून त्यांची बीज तुला केली.
यावेळी त्यांच्या वजनाच्या बरोबरीने ७५ किलो बीज औरंगाबाद महानगरपालिकेस दान करण्यात आले. यात फळशी, आंबल, जायफळ, वावर, कारंबी, गोरखचिंच इत्यादी दुर्मिळ झाडांच्या बीजांचा समावेश आहे. तसेच सर्वांनी आपला वाढदिवस गणपतराव जगताप यांच्या प्रमाणे बीज तुला करून साजरा करावा जेणे करून इतरांना प्रेरणा मिळेल. यावेळी सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सिनेअभिनेता सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, लेखक अरविंद जगताप, सह्याद्री देवराईचे स्वयंसेवक, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांची विशेष उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादकरांनो अन्यथा; तुमची दुकाने होतील सील…!
- गेल्या 7 वर्षांपासून देवेंद्र फडणवीस…; मलिकांचा गंभीर आरोप
- IPL मेगा लिलावाच्या तारखेबाबत मोठे अपडेट
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात ४९ विषयांसाठी २३१ प्राध्यापकांची निवड; रुजू होण्याचे आदेश
- हेमा मालिनीच्या गालांची तुलना रस्त्याशी करणाऱ्या गुलाबरावांनी अखेर मागितली माफी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
