Share

IPL मेगा लिलावाच्या तारखेबाबत मोठे अपडेट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयपीएलच्या (IPL) नवीन हंगामासाठी, बीसीसीआयला मेगा लिलाव करायचा आहे आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आयोजन करणे अपेक्षित होते परंतु आता हा मेगा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, आयपीएलचा मेगा लिलाव जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर होऊ शकतो.

हा मेगा लिलाव जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापूर्वी होणार नाही, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. यापूर्वी, बोर्डाने सांगितले होते की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लिलाव होईल. मात्र आता हा मेगा लिलाव पुढे ढकलला असल्याचे वृत्त आहे. आयपीएलचा हा लिलाव पुढे ढकलण्याचे मुख्य करण म्हणजे, अहमदाबादचा संघ फायनल व्हायला वेळ लागला आहे. अशा परिस्थितीत जानेवारीच्या चौथ्या आठवड्यापर्यंत लिलाव होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, ‘आम्ही अजूनही अहमदाबाद फ्रँचायझीच्या सीव्हीसीच्या मालकीबाबत विशेष नेमलेल्या समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. हे केल्याशिवाय, लिलावाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकत नाहीत. जानेवारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापर्यंत लिलावाची तारीख निश्चित होण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!