औरंगाबाद : शहरातील विविध दुकाने, आस्थापना यांमध्ये काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांकडून २३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यातील अनेकांनी लसीचा एकही डोस न घेतल्याची माहिती समोर येत आहे. कामगार विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून यानंतरही लस न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील एकूण ३१ दुकाने तसेच आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी-कामगारांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. तरी यापुढे देखील लस न घेतल्यास दुकाने सील करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. ही कारवाई ८ ते १७ डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. यामध्ये लस न घेतलेल्या कामगार-कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार ५०० ते २५०० रुपयांपर्यंतचा दंड संबंधित आस्थापनांना आकारण्यात आला.
टीव्ही सेंटर, सिडको एन-सहा, सेव्हन हिल्स, पुंडलिक नगर, पीसादेवी परिसरातील ११ आस्थापनांवर ११ हजार ५०० रुपयांचा तर दर्गा, जवाहरनगर, जालना रोड, सिद्धी कॉलनी, बीड बायपास, शिवाजीनगर, चिश्तिया कॉलनी, सिडको एन-५, सिडको एन-६ परिसरातील २० आस्थापनांवर १२ हजार रुपयांचा दंड हा १८ डिसेंबरदरम्यान आकारण्यात आला.
कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे. त्यामुळेच आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना लसीचा एकही डोस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या, तसेच लसीचा दुसरा डोस चुकविणाऱ्या नागरिकांना दंड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ डिसेंबरपासून मनपा हद्दीत सुरू करण्यात आली असून लस न घेतलेल्या सामान्य नागरिकांवरही आता शहरात कारवाई सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने निवडला वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 संघ; कोहली-रोहितला दिला डच्चू
- ”इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”
- ‘त्या’ पार्टीत कोण मंत्री होते हे जाहीर करा, अन्यथा…; पेडणेकरांचं शेलारांना आव्हान
- Pro Kabaddi : विकास कंडोला करणार हरियाणाचे नेतृत्व
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस


