🕒 1 min read
लाखणी : राज्यातील आघाडी सर्व सामान्यांचं राहिलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाही. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. लाखणी येथे उमेदवाराच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे सरकार सामान्य माणसांचे नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असं सांगतानाच हे सरकार हरवले असून शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील अवस्था पाहून आता माध्यमे देखील म्हणायला लागली आहे की, महाराष्ट्रातील सरकार आहे कुठे? या सरकारचं अस्तित्वच आता दिसत नाही, अशाप्रकारची अवस्था आहे. 3 चाकी सरकार तिघाडी सरकार हे बेईमानीने तयार झालं, पण बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, तशी या सरकारची अवस्था आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मूळावर उठलेलं सरकार, अशी यांची अवस्था आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
????Lakhandur, Bhandara.
Election campaign public meeting for #BJP.
स्थानिक निवडणुकांसाठी प्रचारसभा । लाखांदूर । जिल्हा भंडारा@BJP4Maharashtra #BJP #Vote4BJP https://t.co/c8XH8k9CXj— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2021
मी मुख्यमंत्री असताना धानाचा बोनस देण्याची सुरुवात केली. पूर्वी आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या सरकारने बोनसच बंद केला आहे, असं सांगतानाच नाना पटोले म्हणतात, संविधान खतरे में है. पण खरे कर धान पीक घेणारे शेतकरीच खरे खतरे में आहेत, असा टोलाही यावेळी फडणवीसांनी पटोलेंना लगावला आहे.
आम्ही 5 वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर 4 शेतकऱ्यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, या सरकारला मराठा आरक्षण देता आले नाही. ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्वच धोक्यात आले आहे. या सरकारने इम्पिरिकल डेटा वेळीच जमा केला असतास तर आज ही वेळ आली नसती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- गुलाबरावांच्या आव्हानाला नाथाभाऊंनी दाखवला आरसा, म्हणाले…
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- ”शिवाजी महाराज धगधगता अग्नी, त्यांच्या अवमानानंतर सर्वांचीच बोबडी वळली”
- छत्रपतींच्या आशिर्वादाचे भाजपने असे पांग फेडले का? भुजबळांचा संतप्त सवाल
- ”अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना देऊन महाराष्ट्राच्या संकृतीचे दर्शन दिले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
