मुंबई : राज्यात सध्या नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एका प्रचार सभेमध्ये शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी त्यांच्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना बॉलिवूडची अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे.
‘माझे 30 वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावे की मी काय विकास केला आहे. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले आहेत’, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणत होते. त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हातचा आरसा दाखवला आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. निवडणुकीच्या ओघात केलेले ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंना लोकांनी निवडून दिलं आहे हे माहिती आहे. मी 30-40 वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केले आहे, असे म्हणत एकनाथ खडसे गुलाबराव पाटलांना हातचा आरसा दाखवला आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडणून देताना काम केल्याशिवाय निवडणून देत नाही निदान एवढी तरी समज गुलाबराव पाटलांना असेल असा माझा समज आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ”गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे, यांच्यात संवेदना उरलेल्या नाहीत”
- ”शिवाजी महाराज धगधगता अग्नी, त्यांच्या अवमानानंतर सर्वांचीच बोबडी वळली”
- छत्रपतींच्या आशिर्वादाचे भाजपने असे पांग फेडले का? भुजबळांचा संतप्त सवाल
- ”अजित पवारांनी त्यांचा राखीव सूट अमित शहांना देऊन महाराष्ट्राच्या संकृतीचे दर्शन दिले”
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत


